Thursday, December 12, 2024
Homeशिक्षण२५ जुलै : शिक्षण क्षेत्रातील ६ महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिक वर

२५ जुलै : शिक्षण क्षेत्रातील ६ महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिक वर

१. महाराष्ट्र सरकार अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू शकत नाही – युजीसी

कोरोनाचा प्रादुर्भाव झाला म्हणून महाराष्ट्र सरकारकडे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही, अशी माहिती यूजीसीने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा देशातील उच्च शिक्षणावर प्रभाव पडेल. म्हणूनच यूजीसीच्या निर्देशानुसार सप्टेंबर २०२० पर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. यूजीसीच्या विशेष कायद्यानुसार महामारी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सरकार असे निर्णय घेऊ शकत नाही, असे यूजीसीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या प्रकरणाशी संबंधित याचिकेवर पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी होणार आहे.


२. इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी होणार कमी.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ. १ ली ते इ. १२ वी साठी सुमारे २५ % पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली. शालेय शिक्षण विभागाने घेतला निर्णय.

३. ६९ हजार शिक्षक भरतीबाबतचा निर्णय सुरक्षित.

उत्तर प्रदेशातील ६९ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी यूपीच्या शिक्षण मित्रांनी दखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. यूपीमधील ६९ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी यूपी सरकारने पूर्वीचे निश्चित कटऑफ ४०/४५ मध्ये बदलून ६० टक्के केले. या निर्णयाला उत्तर प्रदेशच्या शिक्षण मित्रांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

४. विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखती ३० आणि ३१ जुलै रोजी होणार.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठीच्या मुलाखती ३० आणि ३१ जुलै रोजी होणार आहेत. यासाठी एकूण ३० उमेदवारांंना असतील. नियुक्ती प्रक्रियेचा एक भाग म्हणून २०  एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या कालावधीत १३१ अर्ज आले होते. नियुक्तीसाठी एक शोध समिती गठीत करण्यात आली असून निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले व प्रधान सचिव संजय चहांदे यांची अध्यक्ष व सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

५. शालेत्र इमारती खाजगी संस्थांच्या स्वाधीन करण्याचा प्रकार.

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.  यामुळे त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी शिक्षण विभागाने शालेय इमारती खासगी संस्थांच्या स्वाधीन करण्याची कवायत सुरू केली आहे. व्याहाड जि.प.शाळेच्या दोन खोल्या खासगी शाळांना देण्यास ग्रामस्थांवर दबाव आणला जात आहे. आता चार वर्गात ८८ विद्यार्थी असून पहिल्या दोन खोल्या कुजल्यानंतर शाळा फक्त दोन खोल्यांमध्ये सुरू आहे.

६. परीक्षेसाठी नवीन युक्त्या शोधा.

वामन तुर्की, दिनेश शेराम आणि एबीव्हीपीचे देवदत्त जोशी आणि विक्रमजीत यांचा समावेश असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. सदस्यांनी राज्यपालांकडे परीक्षा आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन मागवले, त्यानंतर राज्यपालांनी विद्यापीठ प्रशासन व प्राधिकरण सदस्यांना परीक्षा घेण्याची नवीन कल्पना शोधण्याच्या सुचना केल्या आहेत.

संकलन – अमित हटवार

संबंधित लेख

लोकप्रिय