Wednesday, January 15, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडराडारोडा उचलून सांडपाण्याचा निचरा करा - मधुकर बच्चे यांची मागणी

राडारोडा उचलून सांडपाण्याचा निचरा करा – मधुकर बच्चे यांची मागणी

पिंपरी चिंचवड : चिंचवडगाव मधील केशवनगर, तानाजी नगर, आदी भागात अनेक दिवसांपासून नागरिकांच्या काही नागरी समस्या दूर होत नव्हत्या म्हणून महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी पालिका शहर अभियंता मकरंद निकम, ‘ब ‘क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांना निवेदनाद्वारे प्रभागातील नागरी आरोग्य, सांडपाणी संबंधी मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात नमूद केले आहे की, चिंचवडगाव येथील विवेक वसाहत सेवा रस्त्यावर अनेक दिवसांपासून तुटलेला ड्रेनेजचे दोन पाईप पडून असल्यामुळे त्यात कचरा व पाणी साचून त्याची कचराकुंडी होऊन पूर्ण भरली आहे. तसेच तालेरा हॉस्पिटल रस्त्यावर खोदकाम झाल्यानंतर राडा रोडा एकमहिना झाला तसाच पडून आहे, त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. शनी मंदिरा समोर व बीएसएनएल ऑफिस समोर पाण्याचा निचरा होत नाही, तसेच पाऊस उघडून तीन दिवस होऊन गेले त्या ठिकाणी चिखल होऊन मोठी दुर्गंधी सुटली आहे.

प्रसुनसाई सोसायटी शिवाजी उदय मंडळ जवळ पाण्याचा निचरा होत नाही. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते, प्रभागात विविध ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे पाणी तुंबुन चिखल दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी प्रभागात पाहणी करून त्वरित योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

यावर शहर अभियंता मकरंद निकम व ‘ब’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांच्याशी मधुकर बच्चे समस्यांबाबत चर्चा केली. यावर वरील समस्या त्वरित सोडवल्या जातील असे आश्वासन दिल्याचे मधुकर बच्चे यांनी सांगितले.

संपादन- क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय