वंदेभारत-तिकीटदर:2350-1645-1300-930 रु
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: चिंचवड रेल्वे स्थानकात मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस भारत चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.सदरची गाडी 6.38 च्या सुमारास चिंचवड रेल्वे स्थानकात आगमन होताच चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार,पदाधिकारी निर्मला माने,संगीता जाधव, प्रतिभा महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया,प्राधिकरण येथील वंडरकिड्स शिशु वर्गाच्या मुख्याध्यापिका स्वामी मुथा त्यांच्यासमवेत शिक्षक विद्यार्थी, पालक समवेत रेल्वेस्थानकावरील रेल्वे कर्मचारी,प्रवासी तसेच, रेल्वेस्थानक प्रमुख सुनील नायर आदींनी वंदे मातरम् एक्सप्रेसवर पुष्पांची बरसात करून तिचे स्वागत केले.
चिंचवड प्रवासी संघाने या वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले. ही गाडी पूर्ण वातानुकूलीत असून मुंबई ते सोलापूर 455 कि.मी. चा पल्ला 160 कि.मी. ताशी वेगाने अवघ्या 6 तासात पोहचणार आहे. या गाडीचे तिकीट दर अंदाजे मुंबई ते सोलापूर एक्झिक्युटीव्ह चेअर कार तिकीट दर 2350 तर, एसी चेअर कार 1300 रु. दर आहे. तसेच, पुणे ते सोलापूर एक्झिक्युटीव्ह चेअर कार तिकीट दर 1645 तर, एसी चेअर कार 930 प्रति प्रवासी आहे. या दर सर्वसामान्यांना न परवडणारा दर आहे. मध्यमवर्गीय सर्वसामान्य प्रवासी कुटूंबासमवेत प्रवासच करू शकणार नाही. आज अनेक उद्योजक विमानाने किंवा स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना आढळून येतात.
सर्वसामान्य व मद्यमवर्गीय प्रवाश्यासाठी तातडीने तिकीटाच्या दरात 50 टक्के कपात करावी, सध्या 16 डब्बे ट्रेनला असून मध्यमवर्गीयांसाठी पाच जोडण्यात यावे, त्यांच्याकडून सर्व साधारण एक्सप्रेसचे दर आकारण्यात यावे, अशी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने सदर मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या करण्यात येत आहे. तसेच, मुंबई ते सोलापूर, मुंबई-पुणे, पुणे सोलापूर या दरम्यान सर्वसामान्य व मध्यम वर्गीयांसाठी पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्या, तसेच चिंचवड रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.