कोल्हापूर / यश रुकडीकर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवार दि.५/७/२०२४ रोजी पहाटे कंजारभाट वसाहत येथे छापेमारी करून गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांचा मुद्देमाल जप्त करून तो जागीच नष्ट केला. (Kolhapur)
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की साईनगर, कंजारभाट वसाहत, कणेरीवाडी, करवीर या ठिकाणी पहाटेच्या वेळी गावठी दारू तयार केली जाते. (Kolhapur)
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने सापळा रचून ह्या हातभट्ट्यांवर छापेमारी केली. तसेच १)रोहित दिपक घारुंगे ,२)सनी सरवर बाटुंगे ३)अर्जुन रमेश घारुंगे ४)संदीप दिपक घारुंगे ५)जगदीश सुरेश बाटुंगे ६) राकेश सुरेश बाटुंगे सर्व राहणार साईनगर कंजारभाट वसाहत व इतर चार महिला अशा एकूण १०जणांविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Kolhapur)
सदर ठिकाणी दारू तयार करण्यासाठी लागणारे ५ हजार ४०० लिटर कच्चे रसायन, ५०० लिटर पक्के रसायन, २३० लिटर तयार दारू व इतर साहित्य असा एकूण २ लाख १७ हजार १८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, खंडेराव कोळी, संजय पडवळ, संजय हुबे, कृष्णात पिंगळे, हिंदुराव केसरे, प्रकाश पाटील, विनोद चौगुले, नवनाथ कदम, रोहित मर्दाने, सारिका मोटे तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील अवधूत कोरे व ज्योती शिंदे यांनी मिळून केली.
हेही वाचा :
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर
धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत
ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी
सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली
धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ
ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची