Pune : बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आणि म्हाळुंगे या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागातील पाणी प्रश्न अखेर सोडवण्यात आला आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळू लागले आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांनी मोठा दिलासा अनुभवला आहे.
बाणेर-बालेवाडी भागात पाणीपुरवठा टाकी मंजूर झाली होती, पण काम रखडलं होतं. नागरिकांना असलेल्या या अडचणीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला. पुणे महानगरपालिकेच्या 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत मंजूर केलेली पाणी टाकी लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले, आणि या भागात 18 कोटी लिटर पाणीपुरवठा होऊ लागला आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे बाणेर, बालेवाडी भागात पाण्याची गरज वाढली होती. पाण्याच्या या प्रश्नाने अनेक रहिवासी त्रस्त होते, मात्र चंद्रकांत पाटलांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिकांना आता 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे.
Pune
हेही वाचा :
लग्नसराईत सोनं झालं स्वस्त ; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य