Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी !

---Advertisement---
सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी अभिवादन करताना मान्यवर 

सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली – डॉ. चंद्रकांत खिलारे

---Advertisement---

हडपसर / डॉ. अतुल चौरे : भारताच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. आज सर्व क्षेत्रात मुलींनी आपले श्रेष्ठत्व दाखवले आहे. कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही शिक्षणावर मोजली जाते. फुले दांपत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानामुळेच आज महिला वर्ग शिकत आहे. समाज सुधारणेचे कार्य शिक्षणामुळे होऊ शकते. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमधील सावित्रीबाई फुले जयंती समारंभात बोलत होते.   

हेही वाचा ! रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा

कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील मानसशास्त्र विभागाच्या  डॉ.योगिता खेडकर यांनी “स्त्री-पुरुष  समानता” या विषयावर आपले विचार व्यक्त केले. 

पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मानाचे, समतेचे स्थान हवे – डॉ.योगिता खेडकर

डॉ. खेडकर म्हणाल्या की, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मानाचे, समतेचे स्थान मिळायला पाहिजे. आज स्त्रियांना समान संधी मिळत असली तरी अजूनही काही क्षेत्रांपासून स्रीया  वंचित आहेत. स्त्री-पुरुष समता निर्माण झाली पाहिजे. असे विचार डॉ.खेडकर यांनी व्यक्त केले. 

डॉ.शकुंतला सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ. सरोज पांढरबळे यांनी केले. तर आभार डॉ. अशोक पांढरबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिल्पा कुंभार यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा ! जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११९ जागा


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles