Saturday, October 12, 2024
Homeजिल्हानाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारपासून बंद; वाचा काय आहेत निर्बंध ?

नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारपासून बंद; वाचा काय आहेत निर्बंध ?


नाशिक / सुशिल कुवर
 : नाशिकमध्ये कोरोना रुग्णात मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाने कठोर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. आज संध्याकाळी यासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना निर्बंधासंदर्भात माहिती दिली. लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नववीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

भुजबळ म्हणाले की, मुंबईत मुंबईच्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहे. नाशिकमध्ये नाशिकच्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. यामुळे हातावर हात धरुन बसता येणार नाही. २८ डिसेंबर ४२१ कोरोना रुग्ण होते. आता ५ जानेवारीला १४६१ रुग्ण झाले. म्हणजे आठवड्यात हजाराच्या जवळपास कोरोना रुग्ण वाढले. ही वाढ नाशिक शहराप्रमाणे जिल्ह्यातही होत आहे. देवळात गर्दी होईल, असे वातावरण करु नये. नाशिक शहरातील ऑक्सिजन मुबलक प्रमाणात आहे. परंतु ती वापरण्याची गरज येऊ नये. नाशिक जिल्ह्यातील आश्रम शाळेतील १४ मुलांना कोरोना झाला.

हेही वाचा ! जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११९ जागा

● आरोग्य विद्यापीठाकडून मालेगावचा अभ्यास

मालेगावात रुग्णसंख्या कमी झाल्यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाकडून अभ्यास सुरु करण्यात आला आहे. मालेगावात नागरिकांच्या ऍण्डीबॉडी वाढल्या की काय? याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

● काय म्हणाले भुजबळ ?

– सोमवारपासून (ता.१०) नववीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ३१ जानेवारीपर्यंत बंद, फक्त दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा ! रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा

– तुर्त बाजारपेठा बंद नाही. परंतु लोकांनी ऐकले नाही तर ते ही बंद करावे लागतील.

– नाशिकमध्ये नो व्हॅक्सीन नो एन्ट्री मोहीम.

– पर्यटनासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेणार.

ब्रेकींगइंधन दरवाढीमुळे सरकार कोसळले

संबंधित लेख

लोकप्रिय