पुणे : सातार्याची अपूर्वा अलाटकर पुणे मेट्रोची पहिली महिला लोको पायलट ठरली आहे. अपूर्वाने मेट्रो स्टेशन मध्ये कंट्रोलर आणि ट्रेन ॲापरेटर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज ते रूबी हॉल या दोन योजनांचे लोकार्पण मंगळवारी झाले. यानंतर पुणे मेट्रो सर्वसामान्य पुणेकरांसाठी सुरु झाली. मेट्रोमुळे पुणेकरांचा तासाचा प्रवास काही मिनिटांवर आला आहे. अपूर्वा ही पत्रकार प्रमोद लाटकर यांची कन्या आहे.