Wednesday, October 23, 2024
Homeजिल्हामहायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी – प्रागतिक पक्ष

महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी – प्रागतिक पक्ष

Pune: पुणे येथील प्रागतिक पक्षांच्या राज्यव्यापी परिषदेत विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने सर्वसमावेशक भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.

भारताच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी २० नोव्हेंबर ही मतदानाची तारीख जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात प्रागतिक पक्षांनी सुमारे २,००० कार्यकर्त्यांची भव्य राज्यव्यापी परिषद आयोजित केली.

पुणे परिषदेने पुढील त्रिसूत्री स्पष्टपणे मांडली : १. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती-एनडीए राज्य सरकारचा सर्वतोपरी पराभव करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. २. हे सुनिश्चित करण्यासाठी महाविकास-इंडिया आघाडीने स्पष्टपणे सर्व क्षेत्रांमध्ये लोकाभिमुख पर्यायी धोरणे घोषित करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ३. महाविकास आघाडीने प्रागतिक पक्षांसोबत जागावाटपामध्ये सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारून त्यांना त्यांचा न्याय्य वाटा दिला पाहिजे.

या परिषदेला माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे, माजी आमदार नरसय्या आडम व आमदार विनोद निकोले, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील, भाकपचे सुभाष लांडे, समाजवादी पक्षाचे अनिस अहमद, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले, भाकप (माले)चे अजित पाटील, प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पार्टीचे श्याम गायकवाड, लाल निशाण पक्षाच्या मेधा थत्ते यांनी संबोधित केले.

डॉ. अशोक ढवळे यांनी समारोप केला. डॉ. उदय नारकर यांनी प्रास्ताविक व संचालन केले. अजित अभ्यंकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सीताराम येचुरी व बुद्धदेव भट्टाचार्य (माकप), अतुल कुमार अंजान (भाकप) आणि मीनाक्षी पाटील (शेकाप) यांना श्रद्धांजली अर्पण करणारा शोकठराव मांडला. सोलापूर येथील प्रजा नाट्य मंडळाच्या क्रांतिकारी गीतांनी परिषदेची सुरुवात झाली.

या परिषदेच्या अध्यक्षमंडळात मरियम ढवळे (माकप), राम बाहेती (भाकप), ॲड. राजू कोरडे (शेकाप), विठ्ठल सातव (समाजवादी पार्टी), आर. टी. गावित (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष) हे होते.

प्रागतिक पक्षांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील लोक या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान

सलमान खानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी

देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल

पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय