Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune:मनोज जरांगे पाटील यांचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य स्वागत

Pune:मनोज जरांगे पाटील यांचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य स्वागत

पुणे शहराचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी आंबेडकरांची प्रतिमा व भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन केला सन्मान

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२४-पुण्यात मराठा आरक्षण संघर्ध यात्रेचे प्रमुख मनोज जरांगे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )यांच्या वतीने पुणे शहराचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देऊन स्वागत केले आणि या आंदोलनास पाठिंबा दिला,यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत आंदोलनातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.पाणी आणि अल्पउपहार वाटप करण्यात आला.
डॉ सिद्धार्थ धेंडे माजी उपमहापौर पुणे,बाळासाहेब जानराव प्रदेश सचिव आर.पी.आय,संजय सोनवणे,अध्यक्ष,पुणे आरपीआय निलेश आल्हाट,शाम सदाफुले,रज्जाक शेख,मुश्ताक शेख,सुशील सर्वगोड,विजय कांबळे,गजानन जगडे,चंद्रकांत चव्हाण,संजय वायकर,विनोद मोरे,प्रताप धुमाळ,अन्वर देसाई,मंगला गमरे,मीना पांडे,संगिता फ्रान्सिस यासह पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाचे कायकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय