Sunday, September 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune Flooded : पुणे शहरात पावसाचा धुमाकूळ, सोसायट्या मध्ये पाणी शिरले, नागरिक...

Pune Flooded : पुणे शहरात पावसाचा धुमाकूळ, सोसायट्या मध्ये पाणी शिरले, नागरिक हवालदिल (video)

पुणे : पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला, गुरुवारी पहाटे ३५ हजार क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या सोसायट्या, वस्त्या, बंगल्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक उपनगरात पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी २ ते ३ फूट इतकी पोचली आहे. (Pune Flooded)

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. पण बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केले, अनेक घरांमध्ये पाणी शिरले, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये कमरेइतके पाणी साठले. पुण्यात मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल हाल झाले आहेत. (Pune Flooded)

मुठा नदीत खडकवासला धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू झाला त्यानंतर शहरात नदी काठी सर्वत्र पाणी वाढू लागले. मुसळधार अतिवृष्टी मुळे सिंहगड रस्तावरील एकता नगरी, जलपूजन, द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, श्याम सुंदर, निंबजनगर, सरितानगरी या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले.

याबरोबरच वारजे येथील स्वामी विवेकानंद, फ्युचेरा सोसायटी, शिवणे येथील सदगुरू सोसायटी , येरवड्यातील इंदिरानगर, भारत नगर, शांतिनगर, शिवाजीनगर पाटील इस्टेट, पुणे स्टेशन येथील ताडीवाला रोड या परिसरातील वस्त्या, घरांमध्ये पाणी शिरले. (Pune Flooded)

पुणे महानगर पालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड,मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. (Pune Flooded)

पुणे महानगरपालिकेची मदत आणि बचाव यंत्रणा नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी मदतकार्य अहोरात्र काम अथककरत आहे. पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल शहराच्या विविध भागात अडकलेल्या पुणेकरांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम करत आहेत. (Pune Flooded)

संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. पावसामुळे अनेक भागांत पाणी शिरलं. पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.मागच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात नियोजित वेळेपेक्षा तब्बल 15 दिवस उशीरा आला होता. यंदाच्या पावसानं शहरातील जून महिन्याची सरासरीही ओलांडलीय. पुण्यात आत्तापर्यंत २९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

संबंधित लेख

लोकप्रिय