Shirur Lok Sabha Election 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha) वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. Pune
शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून डॉ.अमोल कोल्हे हे रिंगणात आहेत तर महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीयं. त्यामुळे आता शिरूर लोकसभेत आता तिरंगी लढत होणार असल्याचं दिसून येत आहे. तर बारामती मतदारसंघात वंचितने महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शिरुरमधून मंगलदास बांदल, नांदेडमध्ये अविनाश बोसिकर तर परभणीतून बाबासाहेब उगले, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीत स्थान न मिळालेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी आता स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनीही उमेदवारी यादी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी आठ जागांवर उमेदवार दिले होते.
आता तिसऱ्या यादीतही पाच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत वंचितने 24 जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. दुसऱ्या यादीत सोलापूर, माढा, सातारा या महत्त्वाच्या जागांवर वंचितने उमेदवार दिले आहेत. तर तिसऱ्या यादीत नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, शिरुर मतदारसंघात उमेदवारी दिले आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडी येईल, असे चित्र काही दिवसांपूर्वी होते. परंतु महाविकास आघाडीतील नेते व प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकमत झाले नाही.
त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघात नेमका कोणाला फटका बसणार? हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.