Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : पुणे - बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे हडपसर येथे दिमाखात उदघाटन

Pune : पुणे – बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे हडपसर येथे दिमाखात उदघाटन

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : हडपसर येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे उदघाटन हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्ट्रा मॅन दशरथ जाधव यांच्या शुभहस्ते फ्लॅग फडकवून झाले. (Pune)

या प्रसंगी आमदार चेतन तुपे, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, रा.कॉ. पक्ष महारष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनिल बनकर, हडपसर रा.कॉ. अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, हडपसर रा.कॉ. कार्याध्यक्ष अमर तुपे, माजी नगरसेवक मारुती तुपे, माजी नगरसेवक फारूक इनामदार, माजी नगरसेवक शिवाजी पवार, महिला अध्यक्ष वैष्णवी सातव, पल्लवी होले, नम्रता बोदर, दीपाली झेंडे, विजया भोसले, अश्विनी वाघ, आयर्न मॅन डॉ. योगेश सातव, आयर्न मॅन डॉ. रश्मी सातव, आयर्न मॅन डॉ. योगेश गायकवाड, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, तसेच सायकल असोसिएशनचे प्रतापराव जाधव, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य अशोक भोसले, प्राचार्य आर. व्ही. पाटील, प्राचार्य नितीन सावळे, प्राचार्य सचिन भारद्वाज, प्राचार्य आश्विनी शेवाळे, प्राचार्य रंजना पाटील, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे प्रा. प्रीतम ओव्हाळ, प्रा. अनिल दाहोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. (Pune)

दरम्यान ढोल पथक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जागोजागी सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत करत प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुषा भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल जगताप यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

आयुक्त शेखर सिंह यांच्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केली, राहत्या घराची स्वच्छता

संबंधित लेख

लोकप्रिय