Nandurbar Teacher Recruitment : जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. Teacher Bharti
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांच्या पत्रान्वये पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षकातून तद्नंतर निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांनमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणेबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे. (Teacher Recruitment)
त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, नंदुरबार मधील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची 268 रिक्त पदे भरण्यासाठी 22 ते 26 जुलै अखेर कार्यालयीन वेळेत आवेदन पत्र शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, नंदुरबार या कार्यालयात मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या नावे अर्ज करावे, सदर नियुक्तीसाठी निवृत्त शिक्षकांना कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहिल व प्रतीमहिना मानधन 20 हजार देय राहील.
इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवा निवृत्त शिक्षक व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार यांनी निवृत्ती बाबत व इतर कागदपत्रांसह अर्ज सादर करावे.
Teacher Recruitment
हेही वाचा :
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती
श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती
पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू
ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती