Friday, November 22, 2024
Homeराज्यमणिपूर हिंसाचाराच्या विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निषेध सभा

मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निषेध सभा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू आहे. याच हिंसेच्या दरम्यान दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निषेध व्यक्त करण्यात आला.

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटना यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात आज निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जवळ हा निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध सभेमध्ये वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडल्या.

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे, तुकाराम शिंदे, युक्रांदचे सुदर्शन चकाले, एसएफआयचे सोमनाथ निर्मळ, युवक काँग्रेसचे आदिनाथ जावीर, महाज्योती संघर्ष समितीचे नितीन आंधळे, राष्ट्रवादी काँग्रेस ओकार बेनके, राष्ट्रीय काँग्रेस सतिश पवार, नवं समाजवादी पर्याय श्रावणी बुवा, हौस लोकचे ऋषिकेश आडे, VBA प्रितम कांबळे यांसह विद्यापीठामधील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

हे ही वाचा :

पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय