रत्नागिरी : एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट शुक्रवारी आक्रमक झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. तर निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून शनिवारी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंचनाका ते चिपळूण पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम, माजी उपसभापती रमेश राणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप माटे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के महिला आघाडी तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, शहराध्यक्ष दीपिका कोतवडेकर, सोनाली मिर्लेकर, माजी नगरसेविका सीमा चाळके, आदिती देशपांडे, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, युवक पदाधिकारी प्रणिती घाडगे, माजी नगरसेवक बिलाल पालकर, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक सतीश खेडेकर, किसन चिपळूणकर, राहुल शिंदे, जयंत शिंदे, अमीर कुटरेकर, माजी नगरसेवक शिरीष काटकर, संजय तांबडे, सचिन पाटेकर, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरडकर, खालीद पटाईत, मनोज, जाधव, सचिन भोसले, दीपक चव्हाण, डॉ.राकेश चाळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर
संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण
“भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत आहेत” – संजय गायकवाड