Narendra Modi : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंडित गणेश्वर शास्त्री, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि संजय सोनकर यांना पीएम मोदींच्या उमेदवारीसाठी प्रस्तावित करण्यात आले होते. त्यावेळी वाराणसीमध्ये 12 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 18 कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकनापूर्वी सकाळी पंतप्रधान मोदींनी दशाश्वमेध घाटावर पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात गंगेची पूजा केली आणि आरती केली. येथून पंतप्रधान क्रूझमध्ये बसून नमो घाटावर पोहोचले. त्यानंतर पंतप्रधान नमो घाटातून रस्त्याने मैदगीन येथील बाबा कालभैरव मंदिरात पोहोचले आणि मंदिरात दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज दाखल करते वेळी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अभिनेते पवन कल्याण, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, सुभासपचे ओमप्रकाश राजभर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर मुख्यमंत्री वाराणसी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले होते.
Narendra Modi यांची संपत्ती किती ?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यानुसार पीएम मोदींकडे सध्या ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वत:चे घर आणि गाडीही नाही. पंतप्रधानांकडे एकूण 52,920 रुपये रोख रक्कम आहे.
हेही वाचा :
Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात
POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर
मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले
Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू
बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक
अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित
Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?