आंबेगाव : किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने, मागील काही वर्षांपासून तालुक्यातील आदिवासी भागात, रोजगार हमीची सामूहिक कामे सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
वेळोवेळी प्रशासनाशी संवाद साधत तर कधी लोकशाही मार्गाने संघर्ष करत अनेक गावांत मनरेगाची सामूहिक कामे सुरू करण्यात किसान सभेने पुढाकार घेतलेला आहे.
पुणे : जुन्नर येथील हिरडा प्रकल्पास अर्थसाहाय्य मिळण्यासाठी किसान सभेची राज्य सरकारकडे मागणी
नुकतीच तालुक्याच्या आदिवासी भागात, किसान सभेच्या वतीने मनरेगा हक्क-संवाद परिषद आयोजित करण्यात आली होती, या परिषदेत तालुक्यातील आदिवासी भागातील 14 गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या गावातील प्रतिनिधी, यांनी कामाची गरज असल्याचे नमूद केले होते.
या गावात मनरेगाची कामे सुरू करण्यासाठी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.बी गारगोटे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती अर्चना कोल्हे, रोजगार हमी विभागाचे आशिष हुले व किसान सभेचे शिष्टमंडळ यांची एकत्रित बैठक दि.19 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती, सभागृह येथे पार पडली.
‘जनतेसाठी पदपथ’ स्पर्धेतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्राची चार शहरे
या बैठकीत, ज्या गावात कामांची मागणी आहे, तेथे कोणती कामे शेल्फवर आहेत याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. वनविभागाच्या वतीने मनरेगा अंतर्गत कोणती कामे घेता येऊ शकतील याविषयी ही चर्चा यावेळी करण्यात आली. कामे सूरु करताना व कामे सुरू झाल्यानंतर कोणत्या अडचणी येतात याविषयी ही सविस्तर चर्चा होऊन,या अडचणी कशा येणार नाहीत यासाठी नियोजन या बैठकीत करण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील एकूण 20 गावांत मनरेगाची कामे कशी सुरू होतील. याबाबत, यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या कामात मुख्यतः रस्ते तयार करणे ही कामे केली जाणार आहे, यामुळे लोकांच्या हाताला काम मिळतानाच, आदिवासी भागातील वाड्या – वस्त्या एकमेकांना जोडल्या ही जाणार आहेत.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
गावातील श्रमिकांनी आता ग्रामपंचायतमध्ये कामाची मागणी नोंदवल्यानंतर तातडीने कामे सुरू होतील असे प्रशासनाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. प्रशासन करत असलेल्या सहकार्याबद्दल किसान सभेच्या वतीने प्रशासनाचे व विशेषतः गटविकास अधिकारी यांचे अभिनंदन ही करण्यात आले.
या चर्चेत किसान सभेचे डॉ.अमोल वाघमारे, राजू घोडे, अशोक पेकारी व एस.एफ.आय.संघटनेचे अविनाश गवारी व रोशन पेकारी इ. सहभागी झाले होते.