Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याRohit vemula: रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

Rohit vemula: रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

Rohit vemula : हैदराबाद विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येप्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. तेलंगणा पोलीस विद्यार्थी रोहित वेमुलाच्या मृत्यूचा पुढील तपास सुरू ठेवणार आहेत. तेलंगणा पोलिसांच्या डीजीपीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये रोहित वेमुलाची आई आणि त्याच्या भावाने काही संशय व्यक्त केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित वेमुला (Rohit vemula) हा दलित नसल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे.

रोहित वेमुलाने जानेवारी २०१६ मध्ये हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे प्रकरण देशभरात तापले होते. हैदराबाद विद्यापीठासोबतच केंद्रातील भाजप सरकार विरोधात देशभरात आंदोलन झाल्याचे बघायला मिळाले. आता रोहित वेमुला (Rohit vemula) आत्महत्या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना क्लीन चिट दिली आहे.

Rohit vemula दलित नसल्याचाही दावा

क्लोजर रिपोर्टमध्ये, रोहित वेमुला हा दलित नसल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. आपली खरी जात सर्वांना कळेल या भीतीने राहुल वेमुलाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. तेलंगणा पोलिसांनी वेमुलाच्या मृत्यूनंतर ABVP आणि तत्कालीन महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, एमएलसी एन रामचंदर राव आणि कुलगुरू अप्पा राव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.

तेलंगणा पोलिसांच्या डीजीपीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मृत रोहित वेमुलाच्या तपासावर आई आणि भावाने काही शंका व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणाचा अधिक तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाला परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

तेलंगणा पोलिसांनी २ मे रोजी उच्च न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनंतर उच्च न्यायालयाने कुटुंबीयांना त्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनंतर हैदराबाद विद्यापीठात पुन्हा एकदा रोहित वेमुलाचा मुद्दा तापताना दिसत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख

लोकप्रिय