Thursday, December 26, 2024
Homeआरोग्यपंतप्रधान मोदी यांच्या मोठ्या घोषणा : लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार,...

पंतप्रधान मोदी यांच्या मोठ्या घोषणा : लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार, दिवाळीपर्यंत राशन मोफत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचं संकट आणि केंद्र सरकारने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, देशात लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. भारतात गेल्या १०० वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल असे सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की, लसीकरणासाठी राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्री मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

– लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी ही केंद्राची असणार आहे त्यामध्ये केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार आहे.

– २१ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार

– पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार

– परदेशातून भारतात लस आणण्यावर भर दिली जाणार आहे तसेच देशात नेझल लसींच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे.

– देशातील लसीकरण पूर्ण करण्यासाठी परदेशी कंपन्यांसोबत करार करून पुरवठा वाढवणार

– कोरोना काळात सर्वाधिक औषधं निर्मिती केली तसेच एका वर्षात भारतात २ लसींची निर्मिती

– ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत सुरू

संबंधित लेख

लोकप्रिय