Tuesday, June 18, 2024
Homeग्रामीणपिंपरी चिंचवड : स्व . बाळासाहेब देवकर सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना रोजगारनिर्मिती..!

पिंपरी चिंचवड : स्व . बाळासाहेब देवकर सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना रोजगारनिर्मिती..!

पिंपरी चिंचवड : स्व . बाळासाहेब देवकर सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना रोजगारनिर्मितीचे धडे देत रोजगार उपलब्ध करून दिला. 

माजी आमदार विलासराव लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी चर्होली भागातील युवक पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमोल बाळासाहेब देवकर, उपाध्यक्ष ऋषिकेश तापकीर यांच्या सहकाऱ्याने हेे मार्गदर्शन आयोजन केले होते. 

कोरोना महामारीमुळे काम मिळत नसल्याने अनेकानां आर्थिक संकटानांसामोरे जावे लागत आहे. यावेळी महिलांनां घरबसल्या लघुउद्योग कार्यशाळेचे धडे घेत त्यांचा हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. यामुळे दिघीतील महिला व नागरिक आनंद व्यक्त करत आहे.

या लघुउद्योग रोजगारासाठी अभिजीत घोलप, स्वप्नील दळवी, विशाल खाडे, विकास पुंडे, सौरभ बुर्से, सागर लोंढे आदिनींं परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय