Junnar, (रफिक शेख) : विघ्नहर साखर कारखाना ढालेवाडी तर्फे हवेली येथील एका वीटभट्टीवरून ३ वर्षांची मुलगी रात्रीच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आहे. (Junnar)
सविस्तर माहिती अशी की, गणेश काळू भिलाला हे त्यांचे आई वडील, पत्नी व मुलगी रोशनी वय ३ वर्षे, चांदणी वय ८ महिने व मुलगा राम वय ५ वर्षे असे एकत्रित राहण्यास असून ते २०२१ पासून वीट भट्टीवर काम करून उपजीविका करत होते.
सोमवारी (दि.१७) रात्री सर्वजण ९ वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले त्यानंतर रोशनी ही झोपेतून उठली व पाणी पिण्यासाठी मागू लागले म्हणून गणेश भिलाला यांच्या पत्नीने तिला पाणी पाजले व पाणी पिल्यानंतर तिला झोपी लावले. त्यानंतर थोड्या वेळाने गणेश भिलाला यांना बाथरूमला लागल्याने ते झोपेतून उठले व झोपले ठिकाणी पाहिले असता मुलगी रोशणी ही दिसली नाही. त्यानंतर घराच्या आजूबाजूला शोधाशोध करण्यात आली मात्र तिचा कुठेही शोध लागला नाही.
या प्रकरणी गणेश काळू भिलाला यांनी फिर्याद दिली असून भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३६३ नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. या घटनेचा तपास अंमलदार पवार हे करत आहे.
वर्णन
नाव – रोशनी गणेश भिलाला, वय – 3 वर्षे. रंग सावळा, उंची 3 फूट, नाक सरळ, केस लांब, गळ्यात कातडी ताईत, काळा धागा तसेच पिवळे धातूची काचेची माळ, नेसणेस हिरवट रंगाचा हाप बाहीचा फ्रॉक, लाल रंगाची फुल पॅन्ट वरील वर्णनाचे मुली आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा
CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !
IAF : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती
मोठी बातमी : कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीची मागून धडक, अनेक प्रवासी जखमी
धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना
ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली