पिंपरी चिंचवड : अर्धा तास पडलेल्या पावसामुळे चिखली कुदळवाडी उड्डाण पुलाच्या खालून जाणाऱ्या सहापदारी स्पाईन रस्त्यावर प्रचंड पाणी तुंबले. स्मार्ट सिटी अंतर्गत समृद्ध रस्ते पिंपरी चिंचवड शहरवासीयांना मिळाले. मात्र, शहरात सर्वत्र स्थापत्य अभियांत्रिकीचा पूर्ण फज्जा उडाला आहे.
कम्युनिस्ट कार्यकर्ते क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले, ठेकेदारांकडे दिलेल्या विविध विकास कामात पावसाचे पाणी तुंबून शहरात तळी साचतात. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. कोणतेही काम फर्स्ट शॉट ओके करण्यासाठी संबंधित इंजिनिअर्सनी रस्ते विकास करताना तंत्र वैज्ञानिक बुद्धीचा वापर केलेला नाही. रस्ते विकासाची कामे अहोरात्र चालून कायमस्वरूपी रोजगार योजना राबवली जात आहे.