Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसामाजिक दायित्व असलेली माणसे आता उदात्त भावनेने निस्पृह कार्य करत आहेत...

सामाजिक दायित्व असलेली माणसे आता उदात्त भावनेने निस्पृह कार्य करत आहेत – अवधूत कुलकर्णी

‘वुई टूगेदर फाउंडेशन’च्या द्विवार्षिक मेळावा चिंचवड येथे संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
: ‘सामाजिक दायित्व असलेली माणसे विखुरलेल्या स्वरूपात का असेना, समाजात आहेत, ती आता संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित, वंचितांच्या उन्नतीसाठी उपक्रम राबवत आहेत, समस्या निवारण करत आहेत,हे मानवतावादी महान कार्य आहे, करोनाकाळात स्वत:च्या जिवाची बाजी लावणारे तरुण व जेष्ठ कार्यकर्ते निःस्वार्थी, निःस्पृह कार्यातून अधिक ठळक होऊन महामारीच्या काळात सेवा देत होते.आपल्या सभोवतालच्या जगातील समस्याग्रस्त गोरगरीब लोकांच्या जीवनात किमान चांगले दिवस यावेत, यासाठी व्रतस्थ वृत्तीने उपक्रम राबवावेत. आम्ही अशा संस्थांना मदतीचा हात देऊ, असे आश्वासन काशीधाम मंगल कार्यालयाचे संचालक व संस्थेचे सल्लागार अवधूत कुळकर्णी यांनी वुई टूगेदर फाउंडेशनच्या वार्षिक सर्व साधारण सभा व मेळाव्यात दिले.



चिंचवड येथे संस्थेचा द्वितीय वार्षिक मेळाव्याचे (दि.१४) उदघाटन समई प्रज्वलित करून अवधूत कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले. वुई टूगेदर फाउंडेशन ही संस्था कोरोना काळात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापन केलेली आहे. संस्थेच्या वतीने मावळ आदिवासी दुर्गम व गरीब वस्त्यांमध्ये सेवा सक्षमीकरण केंद्रे चालवली जातात. विधवा एकल महिला, घरेलू महिला साठी आधार समुपदेशन, रोजगार माहिती विनिमय, कायदा साहाय्य मार्गदर्शन, जन आरोग्य वैद्यकीय सेवा, जीवरक्षक औषधे, जीवनावश्यक अन्नधान्य बँक, उच्च व परदेशी शिक्षण मार्गदर्शन ईई विविध प्रकारची समूह सेवा केंद्रे शहरात संस्थेचे कार्यकर्ते चालवत आहेत.

ग्रामीण व शहरी गरीबांच्या सेवा केंद्रांना संपूर्ण आरोग्य सेवा देऊ – डॉ.किशोर खिलारे



नवनियुक्त कार्यकारिणीच्या सदस्यांना जन आरोग्यमंच पुणे अध्यक्ष डॉ.किशोर खिल्लारे यांनी शुभेच्छा दिल्या. सरकारच्या मोफत आरोग्य योजना व शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाच्या समस्या यावर बोलताना जन आरोग्य मंच पुणेचे डॉ.किशोर खिल्लारे सांगितले की, मावळ सारख्या दुर्गम भागात आदिवासी, मजूर कुटुंबाना पोषणयुक्त सात्विक आहार मिळत नाही. खंगलेली मुले, अशक्त महिला मुलींचे प्रमाण तिथे जास्त आहे, शहरी भागात पण ही समस्या आहे, दूध, भाजीपाला, मांसाहारी पदार्थ रोजच्या जेवणात त्यांना मिळत नाहीत, परवडत नाहीत, खांडी, कुसवली, सावळा, नागाथली येथे शालेय शिक्षण घेणारी , शाळाबाह्य मुले, स्तनदा माता, वयात आलेल्या मुलींच्या पोषणासाठी फक्त खिचडीसारखे उपक्रम परिणामकारक ठरलेले नाहीत, पूरक, सात्विक सूक्ष्म पोषण मूल्ये असलेले सात पदार्थ एकत्रित करून बनवलेली अन्न व खाद्य पाकिटे त्यांना दिली पाहिजेत, फिरत्या आरोग्य केंद्रातून त्याचे संचालन करणाऱ्या टीमला जन आरोग्य चळवळीतील आमचे वैद्यकीय व आरोग्य स्वयंसेवक आपला वेळ देतील, कुपोषण मुक्तीचा नवा उपक्रम शहरी व ग्रामीण गरिबांसाठी राबवूया असे डॉ.किशोर खिल्लारे यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष सलीम सय्यद, सचिव शंकर कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे यांची निवड


संस्थेच्या नव्या पदाधिकारी व सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये सलीम सय्यद (अध्यक्ष), दिलीप पेटकर (उपाध्यक्ष), शंकर कुलकर्णी (सचिव), दिलीप चक्रे (खजिनदार), सह श्रीनिवास जोशी, सदाशिव गुरव, रविंद्र काळे, चंद्रकांत खांडभोर, श्रीरंग दाते, रुकसाना काझी, भावीन भंडारी, अनिल पोरे, अनिल शिंदे, जयवंत कुलकर्णी, गुरुराज फडणवीस, जाकीर सय्यद, एम के शेख, राजेंद्र महाले, मनीषा लाटकर, रत्नदीप सरोदे, नवनाथ मोरे, अरविंद पाटील, विलास जगताप, रवींद्र शेटे, श्रीकांत गोंदकर, रिझवाना शेख, विनय फाटक, शैलजा कडुलकर, मेघना बेरी, मेघना भोसले, सोनाली डावरे, सोनाली शिंदे, शेहनाज शेख, के रंगाराव, सुरेंद्र जगताप आदीचा नव्या कार्यकारिणीत समावेश आहे. डॉ.किशोर खिल्लारे, प्रा.डॉ राजेंद्र कांकरिया, सीता ताई केंद्रे, मधुकर बच्चे, रोहन चव्हाण, अवधूत कुलकर्णी यांची सल्लागार समिती संस्थेला मार्गदर्शन करणार आहे.

मेळाव्यात मान्यवारांचा सत्कार


या मेळाव्यास शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सीता ताई केंद्रे (संघर्ष मित्रमंडळ ट्रस्ट, चिखली) ,अमोल भालेकर (शिवयोध्दा प्रतिष्ठाण, रुपीनगर), यशवंत कण्हरे, शिवानंद चौगुले (स्वछता दूत पुरस्कार विजेते, महात्मा फुलेनगर), नारायण बडगुजर (वरिष्ठ पत्रकार, दै.लोकमत), संघश्री सोनवणे (महिला कार्यकर्त्या), वैभव छाजेड, मधुकर बच्चे (सामाजिक कार्यकर्ते) ,प्रा.दीपक जाधव, प्रा.वैशाली गायकवाड (विपला फाउंडेशन), ऍड.मनीषा महाजन, ऍड रमेश महाजन ( कायदा सल्लागार) यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्रीनिवास जोशी यांनी केले, संयोजन भावीन भंडारी, चंद्रकांत खांडभोर, योगेश गोंठे, मनीषा लाटकर, राजेंद्र महाले, रुकसाना काझी, शैलजा कडुलकर यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय