पिंपरी चिंचवड – चिखली येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते रोहन दादा चव्हाण यांनी प्रकाशित केलेल्या नववर्ष 2025 च्या दिनदर्शिकेचे उद्घाटन आणि प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (PCMC)
चिखली, मोशी येथील युवामंचचे कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत एकूण २० हजार दिनदर्शिका यावेळी नागरिकांना नववर्षाची शुभेच्या भेट म्हणून वितरित करण्यात येणार आहेत.
चिखली मोशी परिसरातील विविध सोसायट्या आणि समस्त नागरिकांमध्ये घरोघरी जाऊन दिनदर्शिकाचे वितरण केले जात आहे.
या दिनदर्शिकेमध्ये सण वार, विवाह मुहूर्त, राष्ट्रीय उत्सव दिवस तसेच विविध धार्मिक यात्रा, घरगुती उपचार ई. विविध माहिती प्रकाशित करण्यात आली आहे, असे युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन चव्हाण यांनी सांगितले.