पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपळे गुरव येथे लोकनेते लक्ष्मण जगताप ‘शक्तिस्थळ’ या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या विशेष सोहळ्याचे आयोजन उद्या, शनिवार, ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव गावठाण, पुणे येथे करण्यात आले आहे. (PCMC)
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार व नागरी विमान वाहतूक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष विजय उर्फ आप्पा रेणुसे यांच्यासह आमदार महेश लांडगे, शंकर मांडेकर, अण्णा बनसोडे, उमा खापरे, सुनील शेळके व अमित गोरखे यांची देखील या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असेल.
PCMC
या सोहळ्याचे निमंत्रक माजी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, आमदार शंकर पांडुरंग जगताप आणि विजय पांडुरंग जगताप यांनी ही माहिती दिली. प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेले “शक्तिस्थळ” पिंपरी-चिंचवडकरांसाठी सदैव शक्तीदायी व प्रेरणादायी ठरणार आहे.
हे ही वाचा :
वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ
तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू
पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्टर
Jio च्या ‘या’ स्वस्तातील रिचार्ज प्लॅनमध्ये 12 ओटीटी आणि अमर्यादित 5 जी डेटा
आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत
आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार