पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – इंडियन मेडिकल असोसिएशन, पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक महोत्सव अतिशय उत्साहात व जल्लोषात चिंचवड येथे संपन्न झाला. (PCMC)
साडेसात तास चाललेला कार्यक्रम आय एम ए शाखेच्या अध्यक्षा डॉ माया भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या पार पडला.
यावेळी नृत्य, गायन, सौंदर्य स्पर्धा, सारीथॉन आणि महाराष्ट्राची लोकधारा अशा विविध कला गुण दर्शन कार्यक्रमांमध्ये 100 हून अधिक डॉक्टर सदस्य व त्यांचे कुटुंबीय व मित्र मंडळींनी सहभागी होऊन आपली कला सादर केली .
कार्यक्रमांमध्ये प्रथमच फोटोग्राफी, पेंटिंग, रिल्स स्पर्धा झाल्या यामध्ये सर्व वयोगटातील शाखेचे डॉक्टर्स व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्तपणे भाग घेवून आनंद घेतला.
सांस्कृतिक सोहळ्याचे उदघाटन प्रसंगी आय एम ए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ.संतोष कदम आणि प्रसिद्ध गायक आशाताई खाडिलकर , आयएमए महाराष्ट्र प्रदेश उपाध्य डॉ. राजीव वरियाणी, प्रदेश सहसचिव डॉ अलका क्षीरसागर, आय एम ए पुणेचे अध्यक्ष डॉ. राजन संचेती, शाखेचे आधारस्तंभ डॉ. दिलीप कामत तसेच विश्वस्त डॉ. संजय देवधर,डॉ. संजीव दाते, डॉ. विजय सातव,शाखाध्यक्ष डॉ माया भालेराव सचिव डॉ सारिका लोणकर,खजिनदार डॉ. मनीषा डोईफोडे, नियोजित अध्यक्ष डॉ सुधीर भालेराव व सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ. संजीवकुमार पाटील व डॉ.सुमेध अंदुरकर उपस्थित होते.
PCMC
यावेळी डॉ विकास मंडलेचा संपादित वार्षिक डायरी व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या सांस्कृतिक सोहळ्यासाठी यशस्वी होण्यासाठी डॉ. शंकर गायकवाड डॉ. शुभांगी कोठारी डॉ. ज्योती डेकाटे, डॉ. दीपाली टोनगांवकर,डॉ.सुहास लुंकड डॉ.मिलिंद सोनावणे डॉ. रितू लोखंडे व डॉ. रूपाली करवा डॉ. अमृता इंगळे,डॉ. शुभांगी टेकुरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशी माहिती नियोजित अध्यक्ष डॉ सुधीर भालेराव दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ माया भालेराव यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ रूपाली एकबोटे,डॉ शिल्पा क्षीरसागर, डॉ. निहार इंगळे यांनी तर डॉ. सारिका लोणकर यांनी आभार मानले.
हे ही वाचा :
वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ
तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू
पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्टर
Jio च्या ‘या’ स्वस्तातील रिचार्ज प्लॅनमध्ये 12 ओटीटी आणि अमर्यादित 5 जी डेटा
आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत
आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार