PCMC #ड्रग फ्री व अल्कोहोल फ्री होली उत्सव, हजारो विद्यार्थ्यांसह तरुणाईचा जल्लोष
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड मधील रावेत येथे होळी-धुलीवंदनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड (PCMC) महानगराच्या वतीने “वृंदावन होळी फेस्ट” चे आयोजन करण्यात आले होते.
विद्यमान काळात भारतीय सण उत्सवांचे स्वरूप बदलत आहे, त्यातल्या त्यात होळी धुलीवंदन या सणांचे विकृतीकरण वाढत आहे,होळी व धुलीवंदन हे सण राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेमाचे प्रतीक आहेत, जीवनात आणि निसर्गात रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण याचे प्रतीक म्हणून हिंदू धर्मात या सणाला महत्व आहे. तरुणाईला संस्कृतिक दिशा देण्यासाठी वृंदावन होळी फेस्ट रावेत येथे आयोजित केला होता, असे आयोजकांनी सांगितले.

होळी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे
धार्मिक व संस्कृतिक विचारांचा प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगर शाखेच्या वतीने #ड्रग फ्री व अल्कोहोल फ्री होली अशा टॅगलाईन खाली वृंदावन होली फेस्ट भरवण्यात आले होते. PCMC NEWS
या कार्यक्रमामध्ये २५०० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये इस्कॉन प्रस्तुत वृंदावन भजन, भारतीय पारंपारिक वाद्ये केरळ बँड, सोलापुरी हलगी, संबळ यासोबतच लाईव्ह डी जे. असे मुख्य आकर्षण होते. या सर्व प्रकारास उपस्थितांनी विविध वाद्यांच्या तालावर भरभरून दाद दिली. PCMC NEWS
यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, विधान परिषद आमदार उमा खापरे, अभाविप (ABVP) पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. शिल्पा जोशी, प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन, मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव नानासाहेब कांबळे, उद्योजक दिपक भोंडवे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, केशव घोळवे, बाळासाहेब ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे, प्लेसमेंट सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शीतलकुमार रवंदळे, संजिविनी पांडे, बांधकाम व्यावसायिक दिलीप सोनिगरा, प्रताप बारणे, सोमनाथ भोंडवे, महिलांचे व्यासपीठ प्रयास ग्रुपच्या शोभा निसळ, माधुरी कवी, चंद्रकला शेडगे, महानगर अध्यक्ष प्रा.निलेश बिराजदार, महानगर मंत्री सिद्धेश्वर लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. PCMC NEWS


हे ही वाचा :
शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !
मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार
मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ