पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर, (दि.29) : ओम गणेश सोसायटी काकडे टाऊनशिप केशवनगर चिंचवड येथे सदस्य कुटुंबियांनी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली उपस्थितामधून लक्की ड्रॉ काढण्यात आला. महिलांना खास पैठणी तर पुरुषांना मनगटी घड्याळ बक्षीस देण्यात आले.
यावेळी संगीत खुर्ची,लिंबू चमचा,पारंपरिकखेळ, उखाणे, विविध डान्स, गायन असे विविध स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे व रोहिणी बच्चे यांनी ठेवलेल्या लक्की ड्रॉ मधील मानाची पैठणी मानसी सोनार यांना तर मानाचे मनगटी घड्याळ मनोज जोशी यांना मिळाले.
विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक: देविका घोरपडे, अमित विटुळे, अनुष्का कुलकर्णी, तेजश्री कोरे, स्वाती विटुळे, देवेंद्र राजहंस, गीता कोरे, आदींनी विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सोसायटी अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार अजित नाईक यांनी सर्व स्पर्धक व आलेल्या लोकांचे स्वागत केले. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सर्व नागरिकांसाठी टॅटू, कैलोग्राफी, आदी खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
राजू कोरे, सागर जोशी, श्रीकांत सोनार, सुहास राजहंस,अभिजित देशपांडे, गोविंद देशपांडे, मनोज मयेकर, सचिन काळे, मनोज जोशी, सागर धर्माधिकारी, अमित विटुळे, दिपक सावंत, योगेश नाळे, सचिन निंबाळकर, विठ्ठल सोनार, प्रदिप मोकाशी, शरद देशपांडे, राम उन्हाळे, मोघे काका, मधुसूदन लोहार, दिलीप सही आदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.
कैलोग्राफी आर्टिस्ट:शरद कुंजीर तर, टॅटू आर्टिस्ट:प्रशांत बर्वे यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. सेक्रेटरी गौरव पवार यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. ओम गणेश सोसायटी मधील सर्व महिला भगिनी व सभासदांनी अत्यंत उत्तम नियोजन केले होते. सर्वांना कोजागिरीचे चंद्राचे प्रतिबिंब उमटलेले पिण्यास दूध देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.