Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : सावली निवारा केंद्रातील वंचित, बेघर प्रथमच मतदान करणार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज बेघर नवोदीत मतदारांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले. PCMC

---Advertisement---

“गेले ४०-५० वर्षे मतदानापासून वंचित राहिलेल्या आणि सावली निवारा केंद्रात वर्षापासून राहून यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवोदित मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे” असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी केले.

पिंपरी चौक येथे महानगरपालिकेच्या (pcmc) राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सावली निवारा केंद्र येथे ४५ बेघर व्यक्ती राहतात की ज्यांनी यापूर्वी मतदान केले नाही अशा व्यक्तींना या संस्थेचे एम.ए. हुसेन यांनी मतदान कार्ड काढण्यासाठी मदत करून योगदान दिले, त्या नवोदीत मतदारांचे अभिनंदन करणे व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी त्या केंद्रास भेट दिली.

---Advertisement---

या कार्यक्रमास तहसीलदार जयराज देशमुख, नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक, संस्थेचे संचालक एम. ए. हुसैन, व्यवस्थापक गौतम थोरात, सचिन बोधनकर, सामाजिक कार्यकर्त्या अग्नेश फ्रान्सिस,काळजी वाहक मिलिंद माळी, उमा भंडारी, लक्ष्मी कांबळे, लक्ष्मी वायकर, अमोल भाट यांच्यासह ४५ नवोदीत मतदार उपस्थित होते. pcmc news

त्याचाच एक भाग म्हणून आज बेघर मतदारांना मतदान कार्ड वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे अर्चना यादव यांनी सांगितले. अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना सर्व प्रकारची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यांच्यासाठी व्हीलचेअर, प्रसंगी वाहन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ४५ नवोदीत मतदारांनी मतदानाची शपथ घेऊन या निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी नवोदीत मतदारांनी प्रथमच मतदान करण्यात येणार असल्याने समाधान व्यक्त केले आणि इतरांनाही मतदान करण्याचा संदेश दिला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का

---Advertisement---

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles