चिमण्यांना पाणी खाद्य देण्याचा अभिनव उपक्रम
पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : शहरात चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 62 % पेक्षा जास्त खेड्याचे रूपातर शहरात झाले आहे. शेत जमीन कमी होऊन सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे जंगल निर्माण होऊ लागले आहे, यामुळे शहरातील अधिवास कमी होत चालला आहे. यासाठी शहरात पक्षांना पाणी व खाद्य देण्यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे, अशी माहिती मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी जागतिक चिमणी दिना निमित्ताने दिली आहे. (PCMC)
प्रत्येक घरासमोर गॅलरीत पाण्याचे भांडे, खाद्य ठेवा
प्लास्टिकच्या भांड्यामध्ये घरासमोर, गँलरीत पाण्याने भरलेले टोपले व टेरेसवर धान्याची गेल्या 5 वर्षांपासून धान्याची सोय करत आहे. त्यामूळे काही चिमण्या पहाटेपासून गॅलरी येत आहेत, माझी पत्नी संगिता जोगदंड चिमण्यासाठी काळजी घेत आहे.प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सामील व्हावे, असे अण्णा जोगदंड आवाहन केले आहे. (PCMC)
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !
Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले