पिंपरी चिंचवड : मोठ्या जिद्दीने देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, नाना पटोले यांच्या प्रामाणिक प्रयत्नाना यश मिळवुन देण्यासाठी सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराचा मावळ लोकसभा उमेदवार (maval loksabha 2024) संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. PCMC
चिंचवड स्टेशन येथील आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकास संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
दरम्यान सकल मातंग समाजाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी सक्रिय जाहीर पाठींबा दिला.
दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघात मातंग समाजाचा जो सन्मान करेल त्यांच्या सोबत मातंग समाज असेल असं मत समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, प्रदेश समन्वयक युवराज दाखले, साहित्य सम्राट लोकशाहीर. डॉ आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, विशाल कसबे, पैलवान विठ्ठल शिंदे, अविनाश शिंदे, आबासाहेब मांढरे, मंगेश डाखोरे, अनिल तांबे, वसंत वावरे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. pcmc


हे ही वाचा :
ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…
मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी
खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल
राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात
ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !
७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान टक्केवारी साध्य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्मान
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…