पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली हिंजवडी या ठिकाणी उद्योजक सुरज कांबळे यांच्या इच्छा स्नॅक्स सेंटरचे उद्घाटन ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. (PCMC)
या वेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, कार्याध्यक्ष अमोल लोंढे, नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी शहराध्यक्ष अनिल तांबे, गणेश ताटे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
PCMC
दरम्यान शिवशाही व्यापारी संघाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक तयार होऊन आर्थिक व शैक्षणिक प्रगती मातंग समाजा बरोबर बहुजन समाजाची होणार असल्याने उपस्थित पदाधिकारी व मित्र परिवार यांनी समाधान व्यक्त केले.