यमुनानगर, निगडी येथील येथील जलतरण तलाव सुरू करण्यासाठी निवेदन
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : प्रभाग क्र १३, यमुनानगर, निगडी येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव व प्राधिकरण येथील छत्रपत्ती शिवाजी महाराज जलतरण तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वर्षभर लोटले आहे तरी देखील प्रशासनाने सदर तलाव नागरिकांसाठी खुले केलेले नाहीत.
सध्या तीव्र उन्हाळा आहे, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जलतरण तलाव चालू करण्याची मागणी येत आहे. तरी सुद्धा प्रशासन नागरिकांच्या मागणीची दाखल घेत नाही, हे तलाव तातडीने सुरू करावेत, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पालिका प्रशासनास दिला आहे. pcmc
याबाबत सविस्तर निवेदन अतिरिक्त आयुक्त पंकज पाटील यांना सचिन चिखले यांना दिले आहे.

आज दि.२३ रोजी अतिरिक्त आयुक्त पंकज पाटील व रंगराव कराडे यांच्या समवेत तलावांची पाहणी करण्यात आली, सचिन चिखले यांनी ४ मार्च २०२४ रोजी पत्र देऊनही मागणी प्रमाणे १५ दिवसात तलाव सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सचिन चिखले यांच्या सह दानवले, के. के कांबळे, रोहीदास शिवणेकर, मामु मुखर्ताल आदी प्रमुख मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. pcmc news


हे ही वाचा :
मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी
खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल
राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात
ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !
७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान टक्केवारी साध्य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्मान
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…