Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : “अभिराज फाउंडेशनच्या” स्टॉलला पर्पल जल्लोष मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

PCMC : “अभिराज फाउंडेशनच्या” स्टॉलला पर्पल जल्लोष मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

PCMC

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व दिव्यांग भवन फाउंडेशन पिंपरी आयोजित दि. 17 ते 19 जानेवारी 2025 या काळात दिव्यांग बांधवांसाठी पर्पल जल्लोष हा कार्यक्रम ऑटो कस्टल चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता. (PCMC)

या महोत्सवा मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कवी संमेलन व दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.

यामध्ये अभिराज फाउंडेशनच्या स्टॉलमध्ये एम्ब्रॉयडरी रुमाल, लेसचे टेबल नॅपकिन, कापडी डोअर मॅट, सुतळी कर्टन होल्डर, सुतळी कुंडी होल्डर, लाकडी मोबाईल स्टॅन्ड, खणाच्या कापडाचे तोरण, लाकडी मोबाईल स्टॅन्ड , कापडी पिशव्या, कागदी पिशव्या या दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूच्या स्टॉलला दिव्यांग बांधव उद्योजक, दिव्यांगांचे पालक, समाजसेवक, शिक्षक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्टॉल वरील वस्तूची खरेदी केली. (PCMC)

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पर्पल जल्लोष या कार्यक्रमाने उच्चांक गाठला या स्टॉल साठी अभिराज फाउंडेशनचे सर्व कर्मचारी वर्ग, पालक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

हे ही वाचा :

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित

अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान

करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकत रचला इतिहास

भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

Exit mobile version