पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – भिमशक्तीनगर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने भिमशक्तीनगर, कृष्णानगर येथे मिठाई वाटप करुण साजरी करण्यात आली. संस्थेचे सचिव पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे प्रवक्ते विशाल कसबे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. (PCMC)
“छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान योद्धे होते. त्यांचे शौर्य, अतुलनीय नेतृत्व आणि दूरदृष्टी यांनी त्यांना कायमचे अमर केले. त्यांचे जीवन केवळ युद्धे आणि विजयांपुरते मर्यादित नव्हते तर ते न्याय, सद्भावना आणि सामाजिक सुधारणांसाठी देखील समर्पित होते.
ते केवळ एक कुशल लष्करी रणनीतीकार नव्हते तर एक न्यायी राजा देखील होते ज्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अनेक सुधारणा केल्या. आज जेव्हा आपल्याला समाजात समानता, नेतृत्व आणि नैतिक मूल्यांची गरज भासत आहे, तेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचे विचार आपल्याला शिकवतात की खरे नेतृत्व हे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नसावे तर ते सार्वजनिक सेवा आणि न्यायासाठी वचनबद्ध असले पाहिजे. चला आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करूया आणि आपल्या समाजाला एकता, समता आणि न्यायाच्या मार्गावर घेऊन जाऊया. असे विचार विशाल कसबे यांनी मांडले. (PCMC)
यावेळी संस्थेचे खजिनदार विजयसिंह साठे, अनिल बारवकर, दिलीप जाधव, ईस्माईल बागवान, रामकिशन भडंगे, हरिभाऊ लष्करे, सिद्धनाथ देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मिठाईचे वाटप करण्यात आले.

हे ही वाचा :
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!
‘छावा’ चित्रपट 7 दिवस मोफत दाखवला जाणार, वाचा कुठे पाहता येणार ?
महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार