Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : संस्कार भारती स्मृती रंग ७५ चित्रप्रदर्शनाच्या सांगता समारंभाचे आयोजन

राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांची सन्माननीय उपस्थिती

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
: भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीने शहरातील १४१ प्रतिभाशाली चित्रकार कलासाधकांना एकत्रीत करून सलग वर्षभर आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण केली.

---Advertisement---

यात सलग वर्षभर सातत्य ठेऊन चाललेल्या उपक्रमाला अनेक दिग्गज मान्यवर चित्रकारांनी भेट दिली असून पिंपरी चिंचवड शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रकारांना एकत्र करून त्यांची कला प्रस्तुती करण्यासाठी संधी देण्यात आली. या साठी चिंचवड येथील पु ना गाडगीळ अँड सन्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या सर्व चित्रकारांची प्रदर्शने प्रत्येक आठवड्यात संस्कार भरती च्या वतीने लावण्यात आली आहेत.


या चित्रप्रदर्शनी मालिकेचा म्हणजेच स्मृतिरंग ७५ या मालिकेचा सांगता समारंभ झपुर्झा कलादालन कुडजे खडकवासला पुणे येथे दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी निसर्गरम्य वातावरणात संपन्न होणार असून यासाठी संस्कार भारती चे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत, जेष्ठ पुरातत्ववादी आणि मंदिर शास्त्राचे गाढे अभ्यासक गो. बं. देगलूरकर, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य रवी देव पश्चिम प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी, प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.

या वेळी १४१ सहभागी चित्रकारांनी रेखाटलेली क्रांतिकरांची चित्रे याचे प्रदर्शन देखील रसिकांना पाहावयास मिळणार आहे, तसेच मान्यवरांच्या हस्ते या सर्व कलासाधकांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या झपुर्झा कलादालन येथे स्मृतिरंग ७५ प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या सचिव लिना आढाव यांनी केले आहे.

---Advertisement---
Lic
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles