पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (PCMC)
उद्योजक शंतनु प्रभुणे, सोनाली प्रभुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. संगीत शिक्षिका सुलोचना पवार यांनी मार्गदर्शन केले.
PCMC
प्राचार्या डॉ. बिंदु सैनी, उपमुख्याध्यापिका पद्मा बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांनी स्वागत केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
शिक्षिका भारती कबीर यांनी देशभक्तीपर हिंदी गीत सादर केले. शिक्षिका जीली अँथनी यांनी आभार मानले.