पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – भारतीय संविधानाला ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. आपण सर्व मिळून एकजुटीने कार्य करूया आणि आपले शहर, आपला देश अधिक प्रगत, स्वच्छ आणि हरित बनविण्याचा संकल्प करूया आणि भारतीय संविधानाची मुल्ये जोपासत आपल्या देशाला अग्रेसर बनविण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. (PCMC)
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते. तत्पुर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या राष्ट्रध्वजारोहण समारंभास आमदार उमा खापरे, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रविण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अभियंता प्रमोद ओभांसे, संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, देवन्ना गट्टूवार, संजय खाबडे, विजय काळे, बाबासाहेब गलबले, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, पंकज पाटील, माजी नगरसदस्य गोविंद पानसरे, नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अविनाश शिंदे, उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान प्रास्ताविकेचे वाचन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. (PCMC)
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या भाषणातील सारांश –
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाने गेल्या ७५ वर्षात निरंतर विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या काळात औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी चिंचवड शहराने देखील अल्पावधीच विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे नाव प्रामुख्याने घेतले जाते, ही आपल्या शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये शहरातील सर्व घटकांचा सहभाग महत्वाची भूमिका बजावत असून नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अविरतपणे कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड शहराला गौरवशाली इतिहास आणि संतांची परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा अबाधित ठेऊन शहराला स्वच्छ व सुंदर तसेच राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी महापालिकेची वाटचाल यशस्वी ठरत आहे. येत्या काळात देशातील स्वच्छ व सुंदर तसेच राहण्यायोग्य शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा नामोल्लेख प्रामुख्याने केला जाईल असा विश्वास वाटतो. (PCMC)
‘कटिबद्धा जनहिताय’ या महापालिकेच्या ब्रीदवाक्यानुसार नागरिकांना सेवा, सुविधा पुरविताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रशासकीय सेवा सुविधा अधिक गतिमान करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून महापालिकेचे कामकाज कागद विरहीत करण्यासाठी “डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम” प्रणालीचा महापालिकेच्या कामकाजात समावेश करण्यात येणार आहे. तसेच ई- गव्हर्नंस निर्देशांकामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
नागरिकांचा पालिकेच्या प्रशासनात सहभाग वाढावा, त्यांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेच्या ध्येय,धोरणात दिसावे, यासाठी महापालिकेच्या वतीने “अर्थसंकल्पामध्ये नागरिकांचा सहभाग” हा उपक्रम राबविण्यात आला.
PCMC
नागरिकांना सहज सेवा उपलब्ध करू देण्यासाठी महापालिकेच्या कर प्रणालीत सुधारणा करण्यात आल्या असून नागरिकांना सुलभपणे कर भरता यावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून करामध्ये सवलत देखील देण्यात येत आहे.
शहरात निर्माण होणा-या विविध आपत्तीचे व्यवस्थापन करताना आधुनिक शास्त्रीय पद्धती व तंत्रज्ञानाचा अवलंब करून महापालिकेच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची क्षमता देखील वाढविण्यात येत आहे. (PCMC)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापन होऊन सन २०३२ साली ५० वर्ष पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने “व्हीजन@५० शहर धोरण” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ५० व्या वर्षात पिंपरी चिंचवड शहर कसे असावे, याबाबत विचार विनिमय आणि मंथन केले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधा, प्रकल्प उभारण्याबाबत नियोजन आणि निवड करण्यास हातभार लागणार आहे.
पिंपरी चिंचवडमधील वाढती रहदारी आणि शहरी विस्तारामुळे रस्त्यांचा विकास आराखडा तयार करून पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांसह सर्व नागरिकांच्या गरजा पुर्ण करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी महापालिकेच्या वतीने नुकताच “पर्पल जल्लोष हा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दिव्यांगांना उपयुक्त असलेली आधुनिक साधने व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. याचा फायदा दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी नक्कीच होईल याची खात्री आहे.
याशिवाय महापालिका शाळेचा स्तर उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.