पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – अभिराज फाउंडेशन वाकड या दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये गौरवशाली भारताचा लोकशाहीचा उत्सव 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. (PCMC)
या वेळी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिव्या वाजपेयी व रोहित शेणायें (सेवा विश्वम ग्लोबल फाउंडेशन), लायन भाऊ कोकणे, लायन अशोक बनसोडे ( लायन्स क्लब पुणे रहाटणी )व वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सलीम सय्यद व त्यांचे सहकारी व विद्यार्थी,पालक उपस्थित होते. (PCMC)
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले व त्या नंतर राष्ट्रगीत झाले. या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी एक नृत्य सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे असते ग्वाल्हेर येथे झालेल्या अकराव्या नॅशनल अथलेटिक चॅम्पियनशिप फॉर ऑटिझम 2024 या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना व गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कोलाज स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते वैशाली खेडेकर यांनी व आभार प्रदर्शन केले होते श्रीमती रुपनाळकर यांनी या यावेळी ” अभिराज फौंडेशनच्या “डायरेक्टर स्वाती तांबे व रमेश मुसूडगे उपस्थित होते.