फेरीवाला क्रांती महासंघ शिष्टमंडळाशी चर्चा (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील पथ विक्रेत्यांसाठी विशेष आर्थिक नियोजन तसेच हॉकर्स झोन निर्मितीसाठी १० कोटी पेक्षा अधिक रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येईल तसेच फेरीवाला प्रमाणपत्र लवकर वाटप करण्यात येईल, याबाबत लवकर बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत आयुक्त यांनी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या शिष्टमंडळाला आज आश्वासित केले. (PCMC)
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने आज आयुक्त शेखर सिंह तसेच उप आयुक्त मुकेश कोळप यांची भेट घेऊन फेरीवाला योजनाबाबत चर्चा केली.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, नवनियुक्त शहर विक्रेता समिती सदस्य किरण साडेकर, राजू बिराजदार, किसन भोसले, सलीम डांगे, प्रल्हाद कांबळे, अलका रोकडे यांचे सह महासंघाचे महिलाध्यक्षा वृषाली पाटणे, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, संभाजी वाघमारे, लक्ष्मण शेरखाने, सुनील कदम, बालाजी लोखंडे, रवींद्र गायकवाड, महेंद्र वाघमारे, नंदू आहेर, सलीम शेख, कमल लष्करी आदी उपस्थित होते.
PCMC
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अतिक्रमण कारवाईत वाढ झाली असून साहित्य आणि माल जप्त करण्यात येत आहे हे अन्यायकारक असून कारवाई थांबवन्यात यावी.
लवकरच फेरीवाल्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावे. तसेच आगामी अर्थसंकल्पामध्ये १० कोटी रुपयांची तरतूद करावी व नियोजनासाठी लवकरच समितीची बैठक घ्यावी या मागणीसह नखाते यांनी आणि सदस्य यांनी विविध विषयावरती चर्चा करण्यात आली.
आयुक्त यांनी आगामी अर्थसंकल्पामध्ये पथ विक्रेत्यांच्या नियोजन साठी १० कोटीपेक्षा अधिक आर्थिक तरतूद करू तसेच या नियोजनासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करन्यात येईल.
तसेच सुसज्ज हॉकर झोन निर्मितीसाठी आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करू असे आश्वासन आज आयुक्त यांनी महापालिका भवन येथे शिष्टमंडळांना दिले.