Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : घरेलू कामगार कल्याण मंडळास त्वरित अर्थसहाय्य द्या

PCMC : घरेलू कामगार कल्याण मंडळास त्वरित अर्थसहाय्य द्या

घरेलु कामगारांचे मुख्यमंत्री, कामगारमंत्र्यांना निवेदन.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
– महाराष्ट्र राज्यातील घरेलु कामगार संख्या मोठ्या प्रमाणात असून सन २०११ सर्वेक्षणनुसार ११ लाख होती. आता त्यात वाढ झाली असून घरेलू कामगार मंडळास निधी नसल्याने शिष्यवृत्ती योजना,विमा योजना, तसेच सन्मानधन अशा विविध योजना रखडलेल्या असून सरकारचे घरेलू कामगाराकडे पूर्ण दुर्लक्ष झालेला आहे त्यांना त्वरित निधी देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, युवा, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे निवेदन व पत्राद्वारे करण्यात आली.

महासंघातर्फे मुख्यमंत्री कामगारमंत्री यांना व तहसीलदार अर्चना निकम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महिलाध्यक्षा माधुरी जलमुलवार, समन्वयक नम्रता जाधव, उपाध्यक्षा लता गोरे, प्रमिला पालवे,मालन चव्हाण, सोनल साळवी, पुष्पांजली पाटील, मोनाली पाटील, अमृता खेडेकर, माधुरी चौधरी, स्नेहल रुईकर, मेघा भोसले, आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य घरेलू कल्याण कामगार कल्याण मंडळ केले मात्र ते कागदावरच दिसत आहे . महाराष्ट्रातील घरेलू कामगारांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी घरेलू कामगार कल्याण मंडळ सध्या निर्जीव आहे ते त्वरित कार्यान्वित करून घरेलू कामगारांचे आरोग्याचे प्रश्न, त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, सन्मान धन आदी बाबी मिळत नाहीत म्हणून यापूर्वीही अनेक वेळा प्रयत्न केले हे २५० कोटी रू. निधीद्वारे मंडळ कार्यान्वित करू अशा प्रकारच्या केवळ घोषणाच सरकारकडून देण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात काही झालेले नाही. विविध लाभ देण्यासाठी घरेलू कामगार कल्याण मंडळ कार्यान्वित करण्यासाठी अधिक अर्थसहाय्य देऊन हे मंडळ सुरू करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Exit mobile version