Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : आजचे पर्यावरणाचे, रक्षण करणे म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय ज्येष्ठ...

PCMC : आजचे पर्यावरणाचे, रक्षण करणे म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय ज्येष्ठ – साहित्यिक तानाजी एकोंडे

PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संत तुकाराम नगर येथे कौमी एकता सप्ताह दिनानिमित्त  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. (PCMC)

कौमी सप्ताह दिन हा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी सप्ताहात राष्ट्रीय एकात्मितेची शपथ ही दिली जाते.

यावेळी पर्यावरण तज्ञ तानाजी एकोंडे यांनी सांगितले की, नागरीकांनी जगण्यासाठी, आणि रस्ता वाढीसाठी वृक्षतोड केली आहे, प्रत्येकाने ठरवले पाहिजे माझ्यामुळे वृक्षतोड, प्रदूषण होणार नाही याची काळजी माझ्यासह प्रत्येकाने घेतली पाहिजे. (PCMC)

प्रत्येकाने झाडे लावून मुलाप्रमाणे सांभाळ केला पाहिजे फक्त पर्यावरण दिवशी वृक्षारोपणाचा दिखावा न करता वर्षभर झाडे लावून जगवली पाहिजेत आणि देशीच झाडे लावली पाहिजे. “चला घरातून निघूया, पर्यावरण वाचूया “असे म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

आण्णा जोगदंड म्हणाले कि,आज जगामध्ये पृथ्वीचे तापमान वाढत आहे, दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे, नद्यांच्या प्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्याचे अस्तित्व धोक्यात येऊन त्यांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत चालला आहे, कृषी क्षेत्रावर परिणाम होत चालला आहे.

त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून “माझी वसुंधरा” पर्यावरण राबवण्याचे सक्तीचे करावे यासाठी ग्रामविकास व  नगर विकास विभागाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्रमुख पाहूणे अण्णा जोगदंड यांनी केले.

प्रत्येकाने वटवृक्ष व पिंपळ सारखे झाडे लावली पाहिजेत एका ऋतूत ही झाडे जवळपास एक कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवतात म्हणून असे झाडे प्रत्येकाने लावावीत आणि जगवावीत असे आव्हान जोगदंड यांनी केले.

यावेळी कामगार कवी शामराव सरकाळे पर्यावरणावर कविता सादर करुन होणाऱ्या प्रदूषणासाठी व पर्यावरण वाचवण्यासाठी आर्त हाक दिली. आण्णा जोगदंड यांनी पर्यावरणावर कविता सादर केली. केंद्र संचालक अनिल कारळे यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत, साहत्यिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, प्रमुख पाहुणे गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, केंद्र प्रमुख आनिल कारळे, सा.का.गजानन धराशिवकर, मुरलीधर दळवी, शंकर नानेकर, डॉ. सिद्धार्थ नाशिककर,नटवरलाल परमार, उपस्थित होते. सुरेखा मोरे, संगिता क्षीरसागर यांनी संयोजनात सहभाग घेतला.

हे ही वाचा :

तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळ आज धडकणार ताशी वेग ८० किमी

ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले

राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला शुभेच्छा

PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C

PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर

PCMC : लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन

Exit mobile version