पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिखली मोरे वस्ती येथील विश्वरत्न इंलिश मिडीयम शाळेत प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहायक पो निरीक्षक नवनाथ मोटे, पत्रकार शिवाजी घोडे, विठ्ठल पेडणेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव वाघमोडे, सचिव रमाकांत वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. पत्रकार शिवाजी घोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
PCMC
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना आव्हाड, भगवती गडदे यांनी तर आभार प्रतिभा डोके यांनी मानले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतीला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती कांबळे, सोनली तापोळे, कावेरी दिवेकर,सई पांचाळ, माधवी हासूरकर यांच्या सह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.