Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे – शैलजा सांगळे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरातील प्रदूषण कमी करायचे असेल तर प्रत्येक भागात झाडे लावणे गरजेचे आहे. अनेक धर्मादायी संस्था वृक्षारोपण करतात. पण नंतर झाडांचे संवर्धन केले जात नाही. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. असे मत लायन शैलजा सांगळे सांगवी येथील वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले. (pcmc)

लायन्स क्लब पुणे रहाटणीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी येथे 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले व त्याचे संवर्धन ही करण्यात येणार आहे. असे मत रिजन चेअर पर्सन झोन 3 च्या लायन शैलजा सांगळे यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब पुणे रहाटणी सामाजिक कार्यात अग्रेसर असते त्यांचे अध्यक्ष लायन शिवाजी माने व टीमवर्क उल्लेखनीय आहे.

याप्रसंगी वृक्षमित्र ज्यांनी महाराष्ट्रभर पन्नास हजारापेक्षा जास्त झाडांचे स्वखर्चाने वृक्षारोपण केले आहे असे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांनी यावेळी सांगितले.

माजी नगरसेवक संतोष कांबळे यांनी ही झाडे लावण्यासाठी खड्डे खाणून देण्यासाठी मदत केली. तसेच अरुण पवार यांनी दिलेली 200 झाडे ,बांबू ,जाळ्या टेम्पो आणण्यासाठी लायन प्रसाद वाडकर यांनी सहकार्य केले. (pcmc)

यावेळी कै.शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळा व बाबूराव घोलप विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व सांगवी क्रिकेट असोसिएशनच्या सर्व खेळाडूंनी वृक्षारोपण करण्यासाठी मदत केली.

याप्रसंगी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन पर्यावरण लायन किशोर मोहोळकर ,डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन वृक्षारोपण लायन विराट मैसूरी, झोन चेअरपर्सन MJF लायन वसंत भाऊ कोकणे, एमजेएफ लायन वैशाली कोकणे, लायन सविता माने, लायन अशोक बनसोडे, लायन सतीश महाजन, लायन सतिश सावंत, सातारा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण, क्लब खजिनदार लायन विलास कातोरे, राधाकिशन आवारी, जवाहर ढोरे, हिरण सोनवणे, काळू ढोरे, अरुण मोरे अशोक मारणे, अजय दुधभाते, मेहबूब शेख, धम्मा दादा,सर्व क्रिकेट खेळाडू तसेच पिंपळवण संस्थेचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी वृक्षारोपण करताना उपस्थित होते. (pcmc)

---Advertisement---

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लब अध्यक्ष लायन शिवाजी माने, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन क्लब सचिव महेश पांचाळ यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

---Advertisement---

धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक

निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !

दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार

धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles