Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : तळवडे-सहयोगनगरमध्ये प्रलंबित रस्त्यांचे काम अखेर मार्गी!

PCMC : तळवडे-सहयोगनगरमध्ये प्रलंबित रस्त्यांचे काम अखेर मार्गी!

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : तळवडे येथील सुमारे ६०० सदनिकाधारकांना रस्त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आणि एका दिवसात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी करण्यात आली आहे. Positive initiative by Mahesh Landge

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला त्रिवेणीनगर- तळवडे रोडजवळील नवीन सहयोगनगर, शिवशंकर सोसायटी, तळवडे- त्रिवेणीनगर या रस्त्याचे काम रखडले होते. परिणामी, या भागातील ६०० कुटुंबांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागता होता. pcmc news

शिवशंकर कॉलनी येथील विश्वास खांडवे म्हणाले की, रस्त्याअभावी स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत होता. या भागात सुशिक्षीत लोकांची संख्या जास्त आहे. रस्त्याच्या कामासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

मात्र, यश मिळत नव्हते. अखरे आमदार महेश लांडगे यांच्याकडे याबाबत मागणी केली. त्यामाध्यमातून रस्त्याचे काम मार्गी लागत आहे. यापूर्वीही ड्रेनेजची समस्या आमदार लांडगे यांच्या माध्यमातून निकालात निघाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक विशाल शेवाळे, विश्वास मोढवे, हनुमंत शिंदे, तानाजी साळुंखे, बाळकृष्णा भोसले आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया :

भोसरी विधानसभा मतदार संघात नागरी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सोसायटीधारक आणि स्थानिक नागरिकांना रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाबाबत असलेल्या तक्रारी तात्काळ सोडवण्यात येत आहेत. तळवडेतील सहयोगनगर येथे शिवशंकर कॉलनीतील चार रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. लवकरच या रस्त्यांचे काम पूर्ण करुन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. pcmc

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

संबंधित लेख

लोकप्रिय