Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पीसीसीओईआर रावेत येथे मोफत आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

PCMC : पीसीसीओईआर रावेत येथे मोफत आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

एम. एस. ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत मार्गदर्शन (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. ३० – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे सोमवारी (दि. २ डिसेंबर) परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गदर्शन” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी प्रसिद्धीस दिली आहे. (PCMC)

रावेत, पीसीसीओईआर मध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता या “आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गदर्शन” मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. पदवीनंतर परदेशात उच्च शिक्षणासाठी (एम. एस.) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ते विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, इतर माहिती आणि शिष्यवृत्तींबद्दल मार्गदर्शन करतील. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह एम. एस. करण्याचा विचार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यावेळी विद्यार्थ्यांना विविध देशांतील विद्यापीठांबद्दल अधिक माहिती घेता येईल.


त्यामुळे भविष्यातील उच्च शिक्षणासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. यामधे सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आहे. परंतु त्यासाठी क्यू आर (QR) कोड स्कॅन करून नोंदणी करावी किंव्हा +917021247812 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समन्वयक डॉ. दिपाली शेंडे, डॉ. शिवाजी चव्हाण, डॉ. रमेश राठोड यांनी केले आहे. (PCMC)

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय