Saturday, December 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:मोबाईल हेच तरुणाई समोर आव्हान- राहुल गिरी

PCMC:मोबाईल हेच तरुणाई समोर आव्हान- राहुल गिरी

स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान,व्याख्यानमाला

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:’मोबाईल मुळे ओठावरचा संवाद बोटांवर आला आहे. मानव मोबाईलच्या पुरता आहारी गेला आहे.यामुळे पालकांसोबतीचा संवाद हरवला आहे.मायेचा ओलावा कमी झालाय.
केरळच्या एका मुलाने हमालचे काम करता – करता मोबाईलच्या साहाय्याने यूपीएससीची परीक्षा पास झाला तर काहीजण पब्जीच्या आहारी जावून जीव गमवला आहे.मोबाईलचा सकारात्मक वापर केला पाहिजेत.आज व्यसनमुक्ती केंद्रात मोबाईल व्यसनमुक्तीसाठी एक स्वातंत्र कक्ष सुरू केला आहे. हि दुर्दैवाची बाब आहे. आज तरुणांसमोर मोबाईल हे एक मोठे आव्हान बनले आहे. असे मत युवा व्याख्याते राहुल गिरी यांनी व्यक्त केले.


शरद नगर येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेत तरुणाईचे आव्हान आणि जबाबदारी या विषयावर ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, संजय नेवाळे,नामदेव ढाके,कामगारनेते विष्णू नेवाळे,उद्योजक महादेव कवितके,अजय पाताडे, सचिन सानप,शिवाजी अंबिके,मंडळाचे अध्यक्ष रामराजे बेंबडे, उपाध्यक्ष संतोष ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.


श्री गिरी पुढे म्हणाले कि,शिक्षणाने माणूस घडतो. मात्र जास्त शिकलेलेच भ्रष्टाचार करतात. आपल्या आजूबाजूला असलेले नकारात्मक व्यक्तीना बाजूला करा.आपल्या मुलांमध्ये महापुरुषांचे आचार,विचार,संस्कार रुजवले पाहिजेत. “वेस्ट” संस्कृतीचे आचरण न करता बेस्ट स्विकारावे. या मातीतील तरुणांच्या मनात विवेकानंद स्वामींसारखे सामर्थ्य निर्माण करावे. एका अभ्यासानुसार आज जे मोबाईलच्या आहारी गेलेत त्यांच्यामध्ये ब्रेन ट्यूमरच्या प्राथमिक स्टेज लक्षणे आढळून येत आहे.
आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत तेच कार्य प्रामाणिक पणे करणे हेच स्वामींना अभिप्रेत आहे. आधुनिकतेच्या काळात माय,माती, माणुसकी विसरता कामा नये.
स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान,रोटरी क्लब आणि देसाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप व मोती मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात १८० लोकांची तपासणी केली. ७८ रुग्णाना चष्मे वाटण्यात केली व २४ लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.
प्रास्ताविक विश्वास सोहोनी यांनी केले सूत्रसंचालन रामचंद्र पाटील यांनी तर आभार श्रेणीक पंडीत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक हाडके, हंबीरराव भिसे,शंकर बनकर,सिद्राम मालगत्ती, दिलीप मांडवकर,बापू साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय