पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१२-बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालय,शरदनगर,स्पाईन रोड,चिंचवड येथे आज राष्ट्रमाता – राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती ( युवा दिन) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोकुळजी गायकवाड, उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव लहू कांबळे आवर्जून उपस्थित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहुल आहेर संघटनेचेभोसरी विधानसभा अध्यक्ष नितीन मोरे, पर्यावरण समितीचे अध्यक्षा सुषमा भोसले, सामाजिक कार्यकर्त्या शितल भोसले, पत्रकार शिवाजी घोडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेश हारगुडे, संघटनेचे सदस्य चैतन्य बनकर, ,मा. तुषार गाडे, विश्वनाथ लोंढे, विद्यालयाचा माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर पुदाले, व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. बाबाजी शिंदे आवर्जून उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी भाषणे व गीतांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले चैतन्य बनकर, माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर पुदाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. राहुल आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भविष्यात विद्यालयास सढळ हाताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यमान खासदार अमोल कोल्हेसाहेबांच्या फंडातून भरीव मदत केली जाईल याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या दरम्यान संस्थेच्या वतीने इयत्ता 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवनीत अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनचे मा. आहेर, नितीन मोरे, राजेश हारगुडे यांच्या वतीने विद्यालयास सहा पंखे भेट म्हणून देण्यात आले. पत्रकार मा. शिवाजी घोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या काळातील युवकांपुढील आव्हाने विषद केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. बाबाजी शिंदे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती पाटील, सदाशिव झेंडे, सुजाता जोगदंड, सुभाष कावळे, रुपाली पवार, संदीप बोर्गे, पुनम तारख, मिलिंद चोरगे, उमेश माने, कोमल गायकवाड, संगीता शिंदे, दैवशाला चोले, मोहिनी चव्हाण , शिल्पा कासार, अडपद मॅडम, जयश्री महानवर, अमोल सूर्यवंशी, प्रमोद रायकर, धुडकू कुवर, नाना शिंदे, नारायण हिरगुडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र सूर्यवंशी यांनी केले व आभार किशोर बडे यांनी मानले. जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वंदे मातरम् राष्ट्रीय गीताने सांगता झाली.