प्लास्टिक चुकीच्या पद्धतीने हाताळणे घातक (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – असोशिएशन फॉर दि प्रमोशन ऑफ प्लास्टिक्सच्या वतीने मोशी येथे भरविण्यात आलेल्या प्लास्टो 2025 प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. (PCMC)
यावेळी पाटील यांनी प्रदर्शनात सहभागी झालेले उद्योजक व अभ्यागतासोबत चर्चा केली. प्लास्टिक उद्योगाचे भरवलेले प्रदर्शन पाहुन आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, असोशिएशन फॉर दि प्रमोशन ऑफ प्लास्टिक्सचे अध्यक्ष अनिल नाईक, प्लास्टो 25 चे अध्यक्ष अजय झोड, संयुक्त अध्यक्ष निलेश पटेल, सचिव समीर कोठारी, उपाध्यक्ष एन शंकरामान, खजिनदार प्रणव बेल्हेकर, ऍडमिन आनंद कुंभोजकर, सदस्य राज मिर्जे, गोपाळ ढगे, रविंद्र भा.दिघे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या वतीने ना. पाटील यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
प्लास्टिक चुकीच्या पद्धतीने हाताळणे घातकच, मान्यवरांचा सूर
प्लास्टिक हे पर्यावरण विरोधी,किंवा प्लास्टिक हा भस्मासुर आरोग्याला घातक आहे,असा जो अपप्रचार करून प्लास्टिक ला बदनाम केले आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळणे अशक्य आहे. प्लास्टिक वापरणे हे चुकीचे नाही तर प्लास्टिक व चुकीच्या पद्धतीने हाताळणे किंवा रस्त्यावर फेकणे हे घातक आहे. असा सूर प्लास्टो प्रदर्शनामध्ये विविध मान्यवरांनी आवळाला.
मोशी येथे भरविण्यात आलेल्या प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट इको फ्रेंडली रिस्पॉन्सीबल वे या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या सेमिनार मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
यावेळी महा. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी मंच जाधव,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कायदे विभागाचे माजी उपसंचालक डी टी देवळे, प्लास्टिक असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रमुख प्रमोद शहा, आशिष वैश्य, एन एन गुरव, जे एस साळुंके, प्रतीक भरणे, सुब्बा बांगेरा, प्लास्टोच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख नितीन गोरे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
या सेमिनार आयोजनासाठी एंव्हायारमेंटल क्लब ऑफ इंडिया, असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ प्लास्टिक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ प्लास्टिक, महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांनी पुढाकार घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोध घमंडे यांनी तर आभार नितीन गोरे यांनी मानले.
हे ही वाचा :
एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार
१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध
वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ
तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू
पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्ट